समजूत
वहिदा रेहमान म्हंटलं की तुम्हाला एकच वहिदा आठवत असेल ना? आम्हाला दोन आठवतात, आम्हला म्हणजे आमच्या आळीतल्या लोकाना, कारण आमच्या कडे आणखी एक वहिदा आहे म्हणजे होती, कदाचीत तिच्यापेक्षा सरस.. प्रत्यक्षाहून प्रतिमा सूंदर म्हणावं तसं आमच्या वेलणकर बाईंचं हसणं असं मोहक लाजवाब आहे म्हणजे होतं वेलणकरबाईंचं नाव वसूधा पण तरी त्याना वहिदा म्हणून हाक मारणारे सुद्धा बरेचजण आहेत म्हणजे होते कोणी त्याना वय विचारलं की त्या हळूच म्हणतात म्हनजे म्हणायच्या तुला म्हणून खरं वय सांगते पण तुला कोणी विचारलं तर दहा वर्ष कमीच सांग दहा काय त्या आहेत त्यापेक्षा वीस वर्ष लहान दिसतात म्हणजे दिसायच्या बाईना दोन मुलगे दोन सूना , सुना सुद्धा आपल्या सासूवर मनापासून फीदा, धाकटी तर पून्हा पून्हा म्हणायची मी मिहिर कडे बघितलच नाही मी आईना बघूनच हो म्हंटलं मग याला बघितलं आणि म्हंटलं बरा आहे तिच्या या बोलण्यावर आम्ही सगळे हसतो म्हणजे हसायचो मोठा पुण्याला शिफ्ट झाला आणि मिहिरचा मुन्ना घरात आला, मुन्ना आल्यावर मात्र वेलणकर बाई वहिदा बीहीदा काही राहिल्या नाहीत, त्या आनंदाने आज्जी झाल्या आमच्या ...