Posts

समजूत

वहिदा रेहमान म्हंटलं की तुम्हाला एकच वहिदा आठवत असेल ना? आम्हाला दोन आठवतात, आम्हला म्हणजे आमच्या आळीतल्या लोकाना, कारण आमच्या कडे आणखी एक वहिदा आहे म्हणजे होती, कदाचीत तिच्यापेक्षा सरस.. प्रत्यक्षाहून प्रतिमा सूंदर म्हणावं तसं आमच्या वेलणकर बाईंचं हसणं असं मोहक लाजवाब आहे म्हणजे होतं वेलणकरबाईंचं नाव वसूधा पण तरी त्याना वहिदा म्हणून हाक मारणारे सुद्धा बरेचजण आहेत म्हणजे होते कोणी त्याना वय विचारलं की त्या हळूच म्हणतात म्हनजे म्हणायच्या तुला म्हणून खरं वय सांगते पण तुला कोणी विचारलं तर दहा वर्ष कमीच सांग दहा काय त्या आहेत त्यापेक्षा वीस वर्ष लहान  दिसतात म्हणजे  दिसायच्या बाईना दोन मुलगे दोन सूना , सुना सुद्धा आपल्या सासूवर  मनापासून फीदा,  धाकटी तर पून्हा पून्हा म्हणायची मी मिहिर कडे बघितलच नाही  मी आईना बघूनच हो म्हंटलं मग याला बघितलं आणि म्हंटलं बरा आहे तिच्या या बोलण्यावर आम्ही सगळे हसतो म्हणजे हसायचो मोठा पुण्याला शिफ्ट झाला आणि मिहिरचा मुन्ना घरात आला, मुन्ना आल्यावर मात्र वेलणकर बाई वहिदा बीहीदा  काही राहिल्या नाहीत, त्या आनंदाने आज्जी झाल्या आमच्या ...

क्लब हाऊस

उद्योगपती बिलमोरियानी त्या काळात या छोट्या शहरात क्लब संस्कृती आणण्याचा असफल प्रयत्न केला होता. असफल अशासाठी की एक तर ते शहर लहान, आणि क्लबसाठी जी टोलेजंग इमारत उभी केली ती शहरापासून थोडी दूर, त्यात त्या शहरापासून जवळच रेल्वे जाण्याचे संकेत होते ते बारगळले, मग थोडं थोडं करत बरच दूर्लक्ष झालं  आणि जी वास्तू झगमगायला हवी ती काहीशी बाजूला पडली तसे माँर्नींग वाँक घेणारे काही तुरळक हौशी सकाळचे इथे येतात त्या मानाने संध्याकाळी जरा वर्दळ दिसते एक नावाला चहाची टपरी आहे क्लबचं किचन अजून तरी शनिवार रविवार उघडतात आणि तिथले पनीर पकोडे चाखायला काही खवय्ये आवर्जून येतात एकूण त्या एरियासाठी चार रखवालदार तैनात केलेत त्यांची कुटूंबही तिथेच नांदतायत... भोगीरामला तर इथे येऊन चाळीस वर्षा पेक्षा जास्त काळ लोटला कुछ नही बदला असं तो बोलताना एकदा तरी म्हणतोच आता चाळीस वर्ष वास्तव्य म्हंटल्यावर काही लागेबांधे जोडले जातात, काही अधिकार प्राप्त होतात त्यानुसार भोगीरामने पुढाकार घेऊन मुलांच्या क्रिकेट्साठी ग्राऊंडवर पीच तयार करून घेतली आणि मग मुलांची वर्दळ वाढली रविवारी तर मुलांच्या क्रिकेट मुळे सारा पर...

परतफेड

मी अगदी छोटासा होतो तेंव्हा माझे बाबा कांडल्याला नोकरीच्या कारणाने असायचे फक्त दिवाळीच्या सुट्टीत ते एक दिवस मला भेटायला यायचे,माझ्या धाकट्या बहिणीला तर मला वाटतं त्यानी पाहिलेलं सुद्धा नसावं कारण  माझी धाकटी बहीण विजूमावशीकडे असायची , कारण आई आम्हा दोघाना एकदम कशी सांभाळणार? कारण आईलाही आँफीसात खूप काम असायचं ती सकाळी लवकर जायची आणि कधी कधी उशीरा यायची मी खूप लहानपणीच घराचं दार उघडायला शिकलो आमच्या घराची किल्ली शेजारी मोडक वहिनींकडे ठेवलेली असायची त्या माझी यायची वेळ झाली की त्यांच्या गँलरीत  माझी वाट बघत असायच्या मी दिसलो की लगेच त्या किल्ली घेऊन दारात उभ्या असायच्या , मी नीट दार उघडून आत जाताना त्याना थँक्यु म्हणत त्याना किल्ली परत दिली की त्या त्यांचं दार लाऊन घ्यायच्या तेंव्हा आमच्या कडे फोन होता त्यांच्याकडे नव्हता, चार दिवसातून एक तरी फोन मोडकवहिनीं साठी असायचा कधी त्यांची बहीण नाहीतर मोठ्या जाऊबाई फोन करायच्या फोन मीच घ्यायचो त्यामुळे या सगळ्यांशी माझी भेटण्या आधीच ओळख झाली होती त्यांचा कुणाचा फोन आलाकी मी खिडकीतून हाक मारायचो वहिनीsss फोनेssss की त्या लगेच ...

फरक

काल एक शुटींग बघायला गेलो होतो..हल्ली सहसा जात नाही, काल जाणं भाग पडलं जुन्या मैत्रीचा एक अधिकार असतो.. डावलता येत नाही बायको नवर्‍याला प्रेमाने घास भरवते असा शाँट होता.. सीनमधे खोटं खोटं जेवायचं म्हणजे कलाकारांची सत्वपरिक्षा असते... कसं असतं अगदी ताव मारून जेवायचं असतं पण ते खोटं खोटं तांत्रीक बाजू सांभाळत जेवायचा अभिनय करायचा म्हणजे तारेवरची कसरत कँमेरा मुव्हमेंट,सांऊंड वाल्यंच्या सुचना, रिफ्लेक ्टर्सची पोझिशन सहकलाकाराच्या हालचाली त्यांची रिअँक्षन सगळ्याचं भान जेवायचा अभिनय करताना राखावं लागतं कधी पोटात कावळे कोकलत असतात कधी कधी तोंडाला चव नसते जेवायचा मूड नसतो तर कधीतरी वेळ मारून न्यावी लागते सांगून खोटं वाटेल पण कधी कधी दोन दोन दिवसांचे शिळे पदार्थ डीशमधे मांडलेले असतात.. काही ठिकाणी तर बिस्किटं फ़स्त होतात म्हणून त्यावर बेगाँन सुद्धा फवारतात... पण कालचं युनीट नियमाला अपवाद होतं..अगदी हौशी लोक होते.. जेवणाचं टेबल छान दिसावं म्हणून खरच चार जास्तीचे पदार्थ आणले होते आणि सगळ्याना खायला मोकळीक होती.. पहिल्यापासून मराठीत प्रणय दाखवण्याची तीन चार ठिकाणं ठरून गेलेली आहेत १) नवरा द...

मयुचा फोन

आज अचानक मयुचा फोन आला  म्हणाली ओळखलस का? मी अगदी मायेनं म्हणालो कवितेची वही हरवली म्हणून ढसा ढसा रडणार्‍या मुलीला मी कसा विसरेन? आणि सहा सात कविता मामीच्या लक्षात आहेत म्हंटल्यावर हरखून जाणार्‍या मुलीला कोण विसरेल? मामीनी रांगोळी काढली तर त्यावर रात्रीचा पहारा द्यायला वाँचमन ठेवायला निघालेल्या मुलीला कोण विसरेल? आणि देवदिवाळी नंतर रांगोळी झाडायची वेळ आली तरी मामी नक्कोनाsss आजच्या दिवस नको, मी श नीवारी मावशीकडे जाणार आहे तेंव्हा झाड म्हणणार्‍या मुलीला कोण विसरेल मला मामीसारखी साडी नेसायला शिकायचय म्हणून हटुन बसलेल्या मुलीला कोण विसरेल? आणि शिवनेरी गडावर जाऊन विशाल गडावर आलोय अशा समजुतीत फिरणार्‍या मुलीला कोण विसरेल आठवतय ना ? " जाऊदे गं, काय त्यात एव्हढं?" असं तुझी आई सहज म्हणाल्यावर मामी किती रागावली होती, तिला सुद्धा किती खरमरीत ओरडा खावा लागला होता त्या नंतर मंजूचं आमच्याकडे येणं कमीच झालं , मी म्हणालो हिला उगीच इतकं बोललीस, पण मामीचं तर तुला माहीत आहे नव्हे! तुलाच माहीत आहे तू मामीला ओळखतेस चांगलं म्हणूनच तुझ्या आईने येणं कमी केलं तरी तुझ्यासाठी आम्हाला दिवसभर दार ...

प्रेमपत्र

पत्र लिहायची काय गरज? पत्र लिहायची काय गरज? असं स्वत:शी घोकत शेवटी पत्र लिहायला बसले.. खरच तसं काहीच कारण नाही.. सगळं छान आहे, बाबा रिटायर झाल्यावर तर काय... घरी धम्मालच चालू आहे..घराला जाग असते आता खरच काय लिहू सुचत नाही... तू फोन केलास की कसं.. तुला काय बोलायचं सुचत नाही? मी म्हणायचे असं कसं होऊ शकतं ?बोलण्यासाठी फोन केल्यावर बोलणं सुचत नाही? हो, पण असं होऊ शकतं अत्ताच बघना मारे पत्र लिहायला बसल े.. पण ... एखादवेळेस खरच खास कळवण्यासारखं काही नाही.. तू कसा आहेस विचारलं तर परत चिडशील तसंही तुला चिडायला कारण लागत नाही म्हणा.. मीच समजुतदार म्हणून आपली मैत्री टिकली.हे तुला कबूल करावच लागेल नाहीतर आपली ओळख झाल्यानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला तू मला काय गिफ्ट दिलस? ..... रस्त्यावरचं मांजरीचं पिल्लू पकडून आणलस आणि त्याच्या गळ्यात गुलाबी रिबिन बांधून ते पिल्लू माझ्या गळ्यात मारलस... आई अणि ताई खूप वैतागलेल्या तेंव्हा तुझ्यावर माझ्यामुळे गप्प बसल्या... ते माऊचं पिल्लू सुद्धा रुळलं आमच्याकडे..पण तू नाही रुळलास.... रमलास जरासा पण तसा तू मुळचा तिथलाच... आई सारखी म्हणते आता.. मनस्वी आहे तो.. तो म्हण...

एका पायावर

आमच्या इथे गोडांबे म्हणून राहयचे बदलीवर आलेल्या लोकाना भाड्यानी त्यांच्या खोल्या द्यायचे अनेक जोडपी लोकं कुटूंब राहून गेली प्रत्येक वेळी त्यानी घर सोडलं , सामान हालवलं की ते रिकाम्या खोल्या बघून यायचे , किती आवरलं उपसलं बांधून नेलं तरी काही ना काही सामान मागे राहयचं त्या वरून गोडांबे त्या माणसांचं मोजमाप करायचे , त्यांची जिवन पद्धती कशी असेल ठरवायचे... कोणी कधी काही विसरलं तर गोडांबे संपर्क साधून कळवायचे आणि ते सामान किंवा वस्तू पोहोचवली जायची यावेळी जे जोडपं आलं होतं ते त्याना फारसं भावलं नव्हतं एकतर त्यांच्या जगण्याला शिस्त नव्हती आणि नंतर कळलं के ते दोघे पती पत्नी म्हणून असेच राहत होते मग तर त्यांची कुठलीच गोष्ट गोडांब्याना मान्य नसायची घरी आले की सांगायचे गोखले तुम्हाला सांगतो काल अचानक माझ्या पाठीत अशी उसण भरली की मी कळवळलोच कसे काय कोणजाणे दोघे दिवटे घरात होते माझी आरोळी ऐकून दोघे धावले , काय त्यांचा अवतार ती तर चक्क अर्ध्या चड्डीत माझ्या समोर आली मी म्हंटलं तुम्ही नं बोलावता , तुम्हाला ते पसंत नाहीत हे कळत असताना ती दोघं धावली ते बघाना , अर्धी चड्डी कसली...