Posts

जाणीव

मनू असेल तेंव्हा साधरण पाच वर्षांची भारी गोड मुलगी, खूप हट्टी झाली आहे असं तिची मम्मा म्हणायची, पण बाकी कुणाला तसं वाटायचं नाही तसे तिचे हट्टही इंट्रेस्टींग असायचे, तिच्या आत्याच्या लग्नात तिलाही लग्न करायचं होतं मंडवळ्या बांधायच्या होत्या, मजा म्हणून  मम्माने बांधल्याही असत्या पण कोणीतरी अनुभवी बाई मम्माच्या कानात कुजबुजली बाई गं  नसते लाड पुरवू नकोस अत्ता कपाळावर मंडवळ्या चढवल्यास तर जेंव्हा खरच वेळ येईल तेंव्हा जड जाईल आणि म्हातार्‍या नवर्‍याशी सोयरीक जुळवावी लागेल माँर्डन असली तरी ती आईच होती शेवटी , तिच्याच्याने काही हे धाडस झालं नाही शेवटी मुसमुसत मनू झोपली...  एरवी तिच्या हट्टापुढे बरेचदा मम्माच थकून झोपायची कारण मनूच्या बालहट्टामधे बरेचदा तिचा बाबा सामील असायचा मनूला एकदा घरात हत्ती पाळायचा होता, हो  नाही हो नाही करता करता भू भू च्या पिल्लापर्यंत मांडवली फायनल झाली पण मम्मा त्यालाही नकारच देत होती पण मनूचा बाबावर पूर्ण भरवसा होता बाबा पण हो हो करत होता मम्म  करताना, दुपारी मम्माच्या कुशीत गुडूप होताना मनू आपले एक एक बेत ऐकवायची , भू भू ला तिच्य...

बालपण

आम्ही थोरांताच्या बंगल्यात राहयला आलो तेंव्हा दिघे कुटूंब आमच्या शेजारी होतं.आमच्या दोघांच्या घराची मेनडोअर्स विरुद्ध दिशेला होती पण यायला जायला आम्ही सर्रास मधल्या खिडकीचा वापर करायचो आणि तसा इमर्जंसीला तोच रस्ता उपयोगी पडायचा. इमर्जंसी म्हणजे दिघे वहिनीना कसला तरी स्नायूंचा आजार होता अचानक त्यांच्या पाठीत लचक भरायची किंवा हात जखडला जायचा. मुलं घाबरून जायची. आमच्या नावाने ठणाणा केला की आम्ही तयार ीत असल्यासारखे धाव घ्यायचो. उमला त्यांना बरोबर सावरता यायचं असं नेहमी नाही पण तरी वरचेवर व्हायचं. त्यात मुलांचे बाबा पोस्टींग झाल्यामुळे बेरूटला होते. तीन मुलं आपल्या आईच्या आधाराने राहयची मोठी वीन्नी बारावी तर मधला गोपी दहावी तर सगळ्यात धाकटा छेलू सहावीत अशी दिघे कंपनीची गँग होती. शैलेशचं त्याच्यामुळेच छेलू झालं होतं लहानपणी त्याला नाव विचारलं की शैलू पेक्षा सोप्प असं छेलू सांगायचा म्हणे मग तेच नाव कायम झालं होतं पण खरं सांगतो छेलू थोरातांच्या बंगल्याची जान होता. मोठे दोघे तसे अभ्यासात हुषार होतेच पण कधी अभ्यासाचं कारण पुढे करायचं आणि कधी सोयी नुसार टंगळ मंगळ करायची हे दोघाना कळायचं. उमा न...

असामान्य

फक्त खोसला साहब गणेश खानोलकरला गणूखान म्हणायचे आ म्ही अगदी गणेश खानोलकर म्हंटलेलंही त्याला चालायचं नाही, मला गणूच म्हणा असा त्याचा आग्रह असायचा म्हंटलं तर गणू हा खोसला साहेबांकडे एक साधा प्युन होता,सकाळी वेळेवर आँफीस उघडण्या पासनं ते रात्री नीट सगळं कडी कुलपात टाकून आँफीस बंद करण्यापर्यंत सगळी व्यवस्था गणूच बघायचा खारला आठव्या की नवव्या रस्त्यावर खोसला साहेबांचं एक छोटेखानी टुमदार आँफीस होतं , खोस ला साहेब नुकते टीव्ही सिरियलच्या क्षेत्रात उतरले होते नाहीतर त्यांच्या घरचे फिल्म इंडस्ट्रीत स्थिरावले होते, खोसला साहेबानी पुढचा टी व्ही चा वाढता प्रभाव ओळखला होता, म्हणून मोठया उत्साहात या क्षेत्राकडे वळले होते, गणूचं महत्व अशासाठी की तो साहेबांबरोबर अगदी पहिल्या दिवासापासनं होता, मंडी हाऊसच्या अगदी पहिल्या वहिल्या मिटींगला सुद्धा गणू त्यांच्या बरोबर दिल्लीला गेला होता फार लहान वयात गणूचं लग्न झालं होतं त्यामुळे आमच्या पेक्षा वयाने फार मोठ्या नसलेल्या गणूच्या पदरात दोन मुली होत्या मोठी रेवा धाकटी रेणूका गणूच्या बोलण्यात बायकोचा उल्लेख तसा नसायचाच... बायको आहे की नाही असा प्रश्न पडावा ...

शुभ मंगल

तिच्या लग्नाच्या रुखवताची आँर्डर त्याच्या बहिणीला मिळाली बहिणीने त्यालाच मदतीसाठी बोलावलं , बहिणीला मदत म्हणून तो गेला....त्याला नोकरी नाही म्हणून ती त्याच्याबद्दल घरी बोलू शकली नव्हती आणि आता तर तिचं लग्नच ठरलं होतं...  बहीण म्हणाली काहीतरी नवं करूया ..... त्याने बसल्या बसल्या बसल्या  रावळगाव चाँकलेटाच्या चांदीच्या बाहुल्या बनवल्या... बहिणीला हा प्रकार अगदी नवा वाटला  तो मनात हसला ते दोघे भेटायचे तेंव्हा बोलता बोलता हा तला चाळा म्हणून तो अशाच बाहुल्या करून तिला द्यायचा डोक्याचा पसरट भाग,दोन बाजूला पीळ देऊन बनवलेल्या दोन वेण्या आवळून तयार केलेला गळा आणि मग चांदी पसरवून केलेला बाहुलीचा फ्राँक... बहीण म्हणाली अशा अजून बाहुल्या बनव आपण त्याना फेर धरून नाचतायत असं दाखवूया... नवा अँटम ठरेल.. रुखवतात नवा अँटम असला तर चार पैसे अधीक मिळातात.. बहीण बोलत होती त्याच्या भोवती तिला करून दिलेल्या बाहुल्यानी कधीच फेर धरला होता... त्या बाहुल्या ती पण फार मायेनं जपायची भुवनेश्वराहून आणलेली शिंपल्याची डबी त्या बाहुल्या जपून ठेवायला वापरायची.. सव्वाशे बाहुल्या झाल्या की आपण लग्न करू अस ती...

ओघळ

आज डेंटीस्ट कडे गेलो होतो.. बाकी कुठे नाही पण समं दू:खी मंडळी इथे जमतात एकमेकाकडॆ सहानभुतीने पाहतात.कारण वेदनेचं प्रमाण वेग वेगळं असलं तरी वेदना एकच असते... तरी आमच्या निलम कडे वातावरण चांगलं असतं एक तर मंद स्वरात जूनी गाणी दिलासा देत असतात आणि खिडकी बाहेरच्या हिरव्या गार वृक्षांची तालबद्ध सळ सळ वेदनेने हैराण झालेल्या जीवाला धीर देत असते ...आणि आज तर माझ्या समोर माय लेकरांचा विलोभनिय खेळ चालला होत ा..ते सहासात महिन्याचं चुळबुळणारं गोलमटोल गाठोडं आईचा अख्खा चेहरा चाटून काढत होतं.. तिच्या बटा ओढत होतं तिच्या कपाळावरची टिकली काढण्याचा तर त्याने चंगच बांधला होता... आमच्या माईनंतर बाळाशी इतक्या अगम्य भाषेत बोलणारी ही आई बर्‍याच वर्षानी पाहयला मिळाली आमच्या ताईला आई सांगायची अगं ताईsss जरा बाळाशी बोबडे चार शब्द बोलावेत गंss गायीला हम्मा म्हणावं कावळ्याला काऊ म्हणावं त्या त्या दिवसात त्या त्या शब्दांची मौज काही औरच असते.. आणि या उलट माईला सांगावं लागायचं मधूss तुझ्या बोलण्याची बाळाला सवय झाली ना तर त्याला शाळेत जड जाईल होsss.. .हे आठवून मला खुदकन हासूच आलं हिच्याही बाळाला शाळेत जड्च जाणार...

अनोळखी ओळख

चाळ पडायला आली म्हणून तिला घर सोडावं लागलं, तशी नोटीसच आली, तशी नांदती बिर्हाडं कमीच होती बाकी बंद दाराना कुलुपच जास्त होती ती लग्न होउन या चाळीत आली तेंव्हा चांगली गजबजलेली चाळ होती ही, हिला कधी अशी अवस्था प्राप्त होईल वाटलच नव्हतं हिचही नांदतं घर होतं एक एक करत प्रत्येकजण आपला मार्ग धरत चालते झाले, रेशनकार्डावरची नावं कमी झाली , शेवटी कपाळावरचं कूंकूही उतरलं एक दिवस...ही एकटी उरली दगड वीटांची चाळ टेकीस आली पण ही? अशीच ठाम सगळं पचवायला तयार असल्या सारखी दिवस रात्र तिला सगळं सारखच, कितीवेळा घरातला दिवाही लावायची नाही रात्री, स्वत:ची परिक्षा घ्यायची बघुया हे घर आपल्या किती ओळखीचं आहे म्हणत अंदाजाने घरात चालायची, मोजकं सामन होतं बाहेरच्या खोलीत एक काँट , खिडकीजवळ एक स्टूल, कधीचं मोडकळीस येऊन निरुपयोगी ठरलेलं एक शिलाई मशीन, स्वैपाक घरात एक छोटासा ओटा त्यावर पाण्याचा माठ जो एकदा भरला की आठ दिवस पुरायचा मोरी शेजारी एक प्लँस्टीकचं पींप जे कायम अर्ध भरलेलं असायचं स्वैपाक घराच्या खिडकीतून रात्री रस्त्यावरचा जाहिरातीच्या बोर्डाचा उजेड यायचा, पूर्ण अंधारचंही समाधान नाही   गरजा कमी कर...

ठका

आडदांड शरीरयष्टीचा ठका समोर आलाकी अनेकांची गाळण उडायची त्याच्या भेदक नजरेचे किस्से अनेक ठिकाणी चघळले जायचे.. ठका फार कुठे दिसायचा नाही आणि दिसला तर दखल घ्यायला लावायचा त्यानी अनेकाना मार्गी लावल्याच्या वार्ताही अशाच पसारायच्या आणि विरून जायच्या पण त्याचा परिणाम मात्र अधीकच गडद होत जायचा या दहशतीमुळेच हल्ली ठकाची मनमानी खूप वाढली होती.. त्याच्या भेदक नजरेला नजर भिडवणारं पंचक्रोशीत कोणी दिसत नव्हतं पण आज आपल्या नायकाचा नाईलाज झाला... त्याच्या विधवा बहिणीला ठकाने भर बाजारात छेडलं आणि राजरोसपणे तिन्हिसांजेला गावाबाहेर खापरीच्या वाळवंटापाशी यायला बजावलं ती कशीबशी जीव मुठीत ठेऊन घरी आली आनि त्याचाच जाब विचारायला आपला नायक खापरीच्या वाळवंटापाशी आला.. तो आला तेंव्हा तिन्हिसांज पार पडायच्या बेतात होती तरी काळोख कभीन्नं व्हायचा होता.. गावाबाहेर वारा रोंरावत होता, बाभळीची खुरटी झुडपं वारा सोसत निमूट हेलकावत होती इतकीच काय ती त्या वातावरणात हालचाल जाणवत होती निरव शांतता अंगावर येत होती अशा वातावरणात ठका नायकाच्या ताईसाठी व्याकूळ झाला होता आकाशाकडे बघत तो वाळवंटात उताणा पडला होता .. चाहुल लागली तश...