जाणीव
मनू असेल तेंव्हा साधरण पाच वर्षांची भारी गोड मुलगी, खूप हट्टी झाली आहे असं तिची मम्मा म्हणायची, पण बाकी कुणाला तसं वाटायचं नाही तसे तिचे हट्टही इंट्रेस्टींग असायचे, तिच्या आत्याच्या लग्नात तिलाही लग्न करायचं होतं मंडवळ्या बांधायच्या होत्या, मजा म्हणून मम्माने बांधल्याही असत्या पण कोणीतरी अनुभवी बाई मम्माच्या कानात कुजबुजली बाई गं नसते लाड पुरवू नकोस अत्ता कपाळावर मंडवळ्या चढवल्यास तर जेंव्हा खरच वेळ येईल तेंव्हा जड जाईल आणि म्हातार्या नवर्याशी सोयरीक जुळवावी लागेल माँर्डन असली तरी ती आईच होती शेवटी , तिच्याच्याने काही हे धाडस झालं नाही शेवटी मुसमुसत मनू झोपली... एरवी तिच्या हट्टापुढे बरेचदा मम्माच थकून झोपायची कारण मनूच्या बालहट्टामधे बरेचदा तिचा बाबा सामील असायचा मनूला एकदा घरात हत्ती पाळायचा होता, हो नाही हो नाही करता करता भू भू च्या पिल्लापर्यंत मांडवली फायनल झाली पण मम्मा त्यालाही नकारच देत होती पण मनूचा बाबावर पूर्ण भरवसा होता बाबा पण हो हो करत होता मम्म करताना, दुपारी मम्माच्या कुशीत गुडूप होताना मनू आपले एक एक बेत ऐकवायची , भू भू ला तिच्य...