प्रोजेक्ट
हल्ली मुलाना शाळेत पाठवायचं म्हणजे पालकांची शाळा असते, हे वाक्य अनेक पालकांच्या तोंडी ऐकायला मिळतं तसच ते आमच्या नेहाच्या तोंडीही बसलय नेहा तळपदेला दोन मुलं दोघेही अभ्यासात हुशार, मोठा चवथीत तर धाकटा पहिलीत पूर्वी नेहा येता जाता भेटायची आता तिला तसा खरच वेळ नसतो, मुलांचा अभ्यास, मुलांचं वेळापत्रक, मुलांची शाळा सर्वांगीण विकासाच्या नावाखालची धावपळ या बरोबरच मुलाना शाळेतून दिली गेलेली प्रोजेक्ट्स हा जो काय प्रकार आहे तो अकलनीय आहे, आणि नेहाच्या एकूण धावपळीत भर घालणारा आहे नेहाने मुलांसाठीच नोकरीला राम राम ठोकला असला तरी ती काय तशी रिकामी नाही पर्सेस बनवण्याच्या तिच्या व्यवसायाने कधीच जोर धरलाय, एक नाही दोन नाही तर दहा दहा कारिगर तिच्या हाताखाली तिच्या आँर्डरप्रमाणे काम करत असतात , विकीच्या गँरेजला सध्या तिच्या व्यवसायामुळे दुकानाचं स्वरूप आलय, जरा पैठणी फाटली विरली जुनी झाली की नेहाला त्यात विविध आकाराच्या स्टाईल्सच्या पर्सेस दिसायला लागतात त्यात घरच्या जबाबदार्या काही कमी नाहीत सासूबाईना पार्कींसन आहे, सासरे हट्टी आहेत, हेकेखोर सुद्धा आहेत त्यात विकीचं त्यांच्याशी अजिबात पटत...