गोलू म्हणजे गोड
सोनाली सारख्या गोड मुलीला गोलू हे नाव कसं पडलं कोणजाणे.. पण ज्या मोजक्या मंडळीना तिला गोलू हाक मारायचा अधिकार आहे त्यात आम्ही दोघे येतो.ती आमची लाडकी आहे म्हणून सांगत नाही, पण आमची गोलू खरच गोड आहे, उमाच्या शब्दात सूंदर आहे जरा तोंडावर ताबा ठेवला तर तिच्यात अजूनही फरक पडेल पण तसा फरक पडण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाही. कारण एकटी उमा बोलून बोलून किती बोलणार? तिच्या घरी तिचे पप्पा जी बोलतील ती पूर्व दिशा धरली जाते पण ते घरी असतात कुठे? आजी आहे जी गोलूला सकाळी नऊ वाजता सुद्धा उठवताना तिच्या अंगावर अजून एक चादर घालते. अजूनही ती महतप्रयासाने उठल्यावर तिला भिजवलेले बदाम खायला घालते. पप्पाना आपल्या बिझनेस मधून डोकं वर काढायला वेळ नाही. याचा अर्थ त्याना आपल्या गोलूची काळजी नाही असं नाही. पण तिच्या भविष्याचा विचार त्यानी आधीच करून ठेवलाय. त्यांच्या तोलामोलाच्या घराण्यात प्रताप धारगळकरशी तिचं लग्न पक्कं ठरवलय.हे गोलूला माहीत नाही असं नाही. पण वेळ आली की बघू असा गोलूचा संथ अँटिट्युड आहे. उगाच अत्ता पासून कशाला पप्पांसारख्या हटवादी माणसाशी दोन हात करा? असा तिचा सवाल आहे. उमाला म्हणूनच...