रंगीत तालीम
मीता मानगावकर म्हणजे निवृत्त कर्नल मानसींग मानगावकरांची मुलगी मिलेट्रीची शिस्त ही मानगावकराच्या घराच्या पायापेक्षाही भक्कम , कडक, की जोरदार काय म्हणाल तशी जसं वय होत गेलं तशा मानसींग यांच्या मिशा आणिकच झुपकेदार आणि आणि अधिकच टोकदार व्हायला लागल्या, त्यांच्या सौभाग्यवती मर्यादेत राहून जरा हसर्या खेळकर होत्या म्हणून घरात निदान वार्याची झुळूक तरी मोकळेपणानी शिरायची आणि मानसींग मानकरांचं आपल्या सुशील सुस्वरूप पत्नीवर निरातिषय प्रेम होतं तिच्याबद्दल स्वत:पेक्षाही जास्त विश्वास होता, ते शाळेत असताना त्यांच्या मामीनी हळूच त्यांच्या कानात विचारलं होतं " आमच्या बेबीशी लगीन करशिला काय? तेंव्हा मामींची गोलामटोल बेबी मानसींगच्या कडेवरच होती हा प्रश्न अचानक ऐकून मानसींगाने बेबीला मामीकडे देऊन खोलीबाहेर धूम ठोकली होती पण जसजशी बेबी मोठी व्हायला लागली तशी ती बेबी राहिली नव्हती नावाप्रमाणे शकुंतला झाली होती तेंव्हा प्रश्न ऐकून खूली बाहेर धूम ठोकणारा मानसींग ठरवल्या प्रमाणे मिलेट्रीत भरती झाला आणि त्याचं मन शकुंतलेच्या खोलीबाहेर घुटमळायला लागलं , त्यात ती आपल्यासाठी हरताल...