निरोप समारंभ
आम्ही बहुतेक घरं बदलली ती साधारण याच दिवसात पाऊस सुरू झालेला असायचा किंवा सुरू होण्याच्या बेतात असायचा, कधी मोजकं सामान असायचं तर कधी जास्त पण सगळ्यात जड काय जात असेल तर तिथल्या शेजार्यांचा निरोप घेणं घर बदलताना प्रत्येक ठिकाणी निरोपसमारंभ ठरलेला असायचा, भेटींची देवाण घेवाण व्हायची, येत जात रहा अशी आळवणी असायची या बाबतीत आम्ही कायम नशिबवान ठरलो , घरं छान मिळालीच पण प्रत्येकवेळी शेजारीही अगदी घरोब्याचे मिळाले अजूनही त्यातील बहुतेकांशी आमचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत लग्न मुंजी बारशी सगळ्याची आम्हाला निमंत्रणं असतात आणि आम्हीही आवर्जून हजेरी लावतो, नुसती हजेरी नाहीतर त्या समारंभाच्या धावपळीत सहभागी होतो सहभागी होण्यावरनं आठवलं आम्ही सर्वोदय मधे राहयला आलो तेंव्हाचा निरोप समारंभ आमचे सर्वोदय मधले दिसव खरच फार सुखाचे होते त्या तीन वर्षात एकदाही मला सकाळी उठून दूध आणायला केंद्रावर जावं लागलं नाही कारण शेजारच्या उसाळकर वहिनी केंद्रावर काम करायच्या तर येताना दूध घरपोच देऊन यायच्या खालच्या मजल्यावर भोंडे म्हणून राहयचे त्यांचं डिपार्टमेंट लक्षात नाही पण ताजा बाजार त्याना मिळायचा आम्ही ग...