लाकुडतोड्याची गोष्ट
काही गोष्टी कोणी नं ठरवता ठरून जातात आणि मग ठरल्याप्रमाणे घडत राहतात, कधी ठरवलं कोणी ठरवलं हे असले प्रश्र्न मग उरतच नाहीत जसं आई अनंताची लाखोली तेंव्हा पार्लेश्वराला वाहयची त्यावेळी पिशवी पिशवी फुलं तुपे वहिनी घेऊन यायच्या छायाताई एकशे सोळा फुलं आहेत हो, सदुशष्ट फुलं मिळाली, या कळ्या आहेत उमलतील उद्याच्याला , जरा मोजून घ्या हे असे संवाद अजून माझ्या कानात घुमतात त्यावेळी आमच्या इथे रानंच्या रानं माजलेली असायची अनंत चाफा प्राजक्त जांभूळ नागचाफा बकूळ किती झाडं सांगू? मग आमच्या आईचा नेम ठरलेला कधी प्राजक्ताची नाहीतर कधी अनंताची तगारीची लाखोली आई पार्लेश्वराला वहायची लाखोली वाहणं म्हणजे लाख लाख फुलं चातुर्मासात चातुर्मास पूर्ण व्हायच्या आत शंकराच्या पिंडीवर वाहणं , बेलीची लाखोली वाहणारे बरेच्जण असायचे गुंजा वाहणारे सुद्धा कोण कोण असायचे त्यावेळी गुंजेची गोमटी झाडं सुद्धा खूप होती आमच्या भोवती , एक गाव देवी होती तिचं नाव नीट आठवत नाही पण तिला करंज्याचा हजारा वाहयला जायचा , करंजा म्हणजे करंजी नव्हे करंज्याचं हिरवगार तजेलदार झाड असायचं त्याला कडू जहार औषधी फळं लागा...